पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मेट्रोसाठी १२६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्यानंतर आता या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (बुधवारी) केंद्रीय नगरसचिव विभागाने बैठक बोलविली असून, या बैठकीला महापालिका आयुक्त कुमार यांच्यासह वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचा नारळ फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून केवळ चर्चेच्या मार्गावर धावत असलेली पुणे मेट्रो सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) च्या मान्यतेच्या स्टेशनवर आहे. पीआयबीच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ही मान्यता देण्याआधी या प्रकल्पाची गरज लक्षात मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतेच अर्थसंकल्पामध्ये १२६ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर, पालिकेच्या अंदाजपत्रकातही २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निधीचा मार्ग सुकर झाला असून, अंतिम मान्यतेसाठी केंद्रातील हालचालींना वेग आला आहे. बैठकीत शहरातील काही तज्ज्ञांनी भुयारी मार्गाबाबत केलेल्या सूचनांनुसार तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी व अधिकारी पातळीवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी मागील चार महिन्यांपासून पीआयबीसमोर मेट्रो प्रकल्पाबाबत निर्णय होऊ शकलेला नव्हता. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेऊन तो केंद्राला कळविला जाणार आहे. केंद्राची बैठक होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येत्या शनिवारी ( दि.७) केवळ मेट्रो प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये मेट्रो प्रकल्पाशिवाय अन्य प्रश्नांवर चर्चा होणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत कळविण्यात आल्याचे भाजपाचे शहर अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी कळविले आहे.
मेट्रोसाठी दिल्लीत बैठक
By admin | Updated: March 4, 2015 00:34 IST