शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

By admin | Updated: May 15, 2016 00:42 IST

येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे

दौंड : येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे. पाणी दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले खानवटेपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे पाणी वडगाव दरेकर या गावापर्यंतच पोहोचू शकले नाही, ते केवळ नदीपात्रातील पाणीचोरी आणि बेसुमार वाळू उपशामुळे झालेले खड्डे. तसेच ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे वडगाव दरेकरच्या पुढील गावातील शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेले आहेत. जिथपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचले, त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना झाला. नदी आटत चालली असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून हे पाणी काही ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या पद्धतीने सर्रासपणे चोरून ते टॅँकरमध्ये भरून इतरत्र वापरले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साधारणत: एका वाळूच्या ट्रकमधील वाळू धुण्यासाठी किमान ५०० लिटरच्या जवळपास पाणी लागते. परिणामी, तालुक्यात ठिकठिकाणी दररोज १०० च्या वर बेकायदेशीर ट्रकमधील वाळू धुतली जाते. >निरगुडेतील बंधाऱ्यातून खासगी वापरासाठी उपसाशेटफळगढे : निरगुडे (ता. इंदापूर) येथील खडकवासला कालव्यातून भरलेल्या बंधारा आणि लगतच्या खासगी विहिरीचा उपसा बंद करावा, अशी मागणी गावचे उपसरपंच ब्रह्मदेव केकाण यांनी केली आहे. नुकतेच खडकवासला कालव्यातून पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यामधून सार्वजनिक विहिरीलगतचे बंधारे भरलेले आहेत. मात्र, बंधाऱ्यालगत अन्य खासगी विहिरी आणि विद्युतपंपाच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू झाला आहे. या पाणीउपशामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे बंधारे आणि सार्वजनिक विहिरीलगतचा खासगी पाणीउपसा बंद करावा, अशी मागणी उपसरपंच केकाण यांनी केली आहे. उपसा करणारे शेतकरी यांना उपसा बंदच्या सूचना तालुका प्रशासनने कराव्यात, सूचना करूनही जे उपसा करतील, त्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केकाण यांनी केली.