शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

महापौरांचा काटकसरीचा सल्ला

By admin | Updated: March 16, 2017 02:13 IST

पुणे शहराचा विकास हेच भाजपाचे एकमेव ध्येय आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी व अन्य मोठ्या प्रकल्पांसाठी निधी लागेल.

पुणे : पुणे शहराचा विकास हेच भाजपाचे एकमेव ध्येय आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी व अन्य मोठ्या प्रकल्पांसाठी निधी लागेल. केंद्र व राज्य सरकारकडून तो मिळवला जाईलच; पण स्थानिक स्तरावरही काटकसर केली जाईल. यापुढे दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या पहिल्याच वार्तालापात स्पष्ट केले. पर्यावरण तसेच महिला सुरक्षा आदी मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.महापौरपदी निवड झाल्यानंतर महापौर कार्यालयात मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी आपला पहिलाच संवाद साधला. त्यांच्यासमवेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, ‘‘आमच्यावर मोठी जबाबदारी आहे, याची पूर्ण जाणीव आहे. मेट्रोच्या कामाचे आम्ही फक्त भूमिपूजन केले नाही तर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. नदीसुधारसाठीचा निधीही प्राप्त झाला आहे, तेही काम सुरू करण्यात येईल. रेंगाळलेले असे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे.’’पुणे शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यात सुचविलेल्या कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारची आर्थिक मदत होईलच; पण त्याशिवाय स्थानिक स्तरावर निधी उभा करण्यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, असे स्पष्ट करून महापौर म्हणाल्या, ‘‘कडू औषधानेच रोग बरा होतो. मात्र त्याचबरोबर महापालिकेच्या खर्चात आवश्यक तिथे काटकसरही केली जाईल. दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देण्यात येईल.’’ कडू औषध म्हणजे मिळकतकरात वाढ करणार का, या प्रश्नावर महापौरांनी ते आता नाही, नंतर कळेल, असे म्हणत टोलवला.शहरात सिमेंटचे जंगल वाढत चालले आहे. त्यासाठी पर्यावरणविषयक उपक्रम राबवण्याला आपण प्राधान्य देऊ, असे महापौरांनी सांगितले. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प महापालिकेच्या प्रत्येक इमारतीमध्ये राबवता येईल का याची तपासणी करू.त्याचबरोबर वृक्षारोपणाचे कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित करण्यात येतील. झोपडपट्टीमधील रहिवाशांना परवडणारी घरे देण्यासाठी त्या प्रकारच्या योजना तयार करण्यात येतील. सार्वजनिक आरोग्यांच्या सुविधाही त्यांना अल्प दरांमध्ये मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू, असे महापौर म्हणाल्या. महिला सुरक्षा हासुद्धा आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा विषय असेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)