शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: March 5, 2017 04:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबतची

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबतची उत्सुकता शहरवासियांना आहे. याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पिंपरीत झाली. त्या वेळी महापालिकेतील पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट यांना देण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. महापालिकेच्या निवडणुक निकालानंतर पिंपरी, चिंचवड की भोसरीचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. गटबाजी विषयीची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक, शहर पातळीवर पदाधिकाऱ्यांची बैठक पिंपरीत झाली. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, निरीक्षक सुजितसिंग ठाकूर, संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, महेश कुलकर्णी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांनी नगरसदस्यांची संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे विकास कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करावा व पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करावा. (प्रतिनिधी)कोणत्या गटाला मिळणार प्राधान्यमहापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबत गेल्या आठवडाभरापासून चर्चा सुरू आहे. शहराध्यक्ष जगताप, आमदार लांडगे की खासदार साबळे यांच्यापैकी कोणत्या गटास प्राधान्य मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर आजच्या बैठकीत पडदा पडला. पदाधिकारी निवडीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून ते कार्य निर्णय घेतात याचकडे लक्ष लागले आहे.