शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी स्टंटबाजी थांबवावी

By admin | Updated: November 7, 2016 01:42 IST

महिलांसाठी आरक्षित बसमधील जागेवर बसून महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी ते महापालिका असा प्रवास केला. त्यामुळे महिलांना ताटकळत उभे राहावे लागले

पुणे : महिलांसाठी आरक्षित बसमधील जागेवर बसून महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी ते महापालिका असा प्रवास केला. त्यामुळे महिलांना ताटकळत उभे राहावे लागले अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून प्रवास केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच महापौरांनी ही स्टंटबाजी लगेच थांबवावी, अशी टीका भाजपाचे शहराघ्यक्ष योगेश गोगावले यांनी केली आहे. महापौरांनी केलेला पीएमपीमधून प्रवास व कचरा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका याबाबत गोगावले यांनी टीका केली आहे. जगताप बेजबाबदारपणे वागत असून, सवंग प्रसिद्धीसाठी त्यांचा आटापिटा सुरू आहेत. जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या शहराची लाज वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. शहराध्यक्षांच्या या टीकेनंतर तरी महापौरांनी प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी थांबवून पुण्याच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करावेत असा सल्ला गोगावले यांनी महापौरांना दिला आहे.राष्ट्रवादीने पुणेकरांचा विश्वास गमावल्यानेच कचरा प्रकल्पांना नागरिक खो घालत आहेत अशी बेजबाबदार विधाने करण्याची वेळ महापौरांवर आली आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रश्नांची जाण नसल्याचे महापौरांच्या वर्तनातून अधोरेखित होत आहे अशी टीका गोगावले यांनी केली. महापौरांनी पीएमपीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे, त्या वेळी पीएमपीचा कारभार रसातळाला गेला. आता आचारसंहिता असल्याने कोणताही निर्णय घेता येणे शक्य नसताना पीएमपीतून केवळ स्टंटबाजी म्हणून महापौरांनी प्रवास केला असल्याची टीका गोगावले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)