शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी सोडला लाल दिव्याचा सोस

By admin | Updated: April 22, 2017 03:54 IST

पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपापल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर

पिंपरी : पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपापल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना गाडीवरील दिवा काढण्याचा सोस काही आवरत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर महापौर काळजे यांनीही आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याची कार्यवाही शुक्रवारी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम महापालिकेचे वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी महापालिकेचे वाहन नाकारले. जनतेच्या पैशांची बचत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. तसेच पत्रकारांना स्थायी समितीच्या बैठकीस बसण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, महापौरांनी शासकीयच वाहन वापरणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. दरम्यान, जनता आणि सरकार यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनावरील लाल दिवा हटविला. त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी लाल दिवा काढला. गुरुवारी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही आपल्या वाहनावरील दिवा काढला. पिंपरी-चिंचवडचे महापौर कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, त्यांनी दिवा काढण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली. उलट लाल दिव्याचे समर्थन केले. (प्रतिनिधी)‘लोकमत’ची घेतली दखल नितीन काळजे म्हणाले, ‘‘महापौरांना विविध कार्यक्रमांसाठी बाहेर फिरावे लागते. त्यामुळे दिवा आवश्यक आहे. याबाबत नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल.’’ असे विधान केल्याने महापौरांना लाल दिव्याच्या गाडीचा सोस असे वृत्त ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित झाले. याची दखल घेत वरिष्ठांकडून महापौर यांना आदेश देण्यात आले. पंतप्रधान व मुख्यमंत्री आपल्या गाडीवरील दिवा काढतात, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, अशी कानउघाडणी केली. त्यानंतर महापौरांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहनावरील लाल दिवा काढला.