शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणूक २५ रोजी होणार

By admin | Updated: February 13, 2016 03:21 IST

महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तएस. चोक्कलिंगम

पुणे : महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तएस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून २० फेब्रुवारी रोजी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षांचा आहे, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने सव्वा-सव्वा वर्षासाठी महापौर पदासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दत्तात्रय धनकवडे यांनी सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसचे आबा बागुल यांनाही उपमहापौरपदाचा राजीनामा सादर केला आहे. महापौरांच्या राजीनाम्याला मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार नवीन महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, विकास दांगट पाटील, नंदा लोणकर, सुभाष जगताप, दिलीप बराटे या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी मुकारी आलगुडे, सुधीर जानज्योत, सुनंदा गडाळे, सतीश लोंढे , मिलिंद काची, लता राजगुरू यांनी अर्ज केले आहेत. येत्या २० फेब्रुवारीला पक्षाकडून उमेदवाराची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.