शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बंगल्यात चोरट्यांंचा डल्ला

By admin | Updated: December 30, 2014 00:18 IST

शहराचे प्रथम नागरीक असलेल्या महापौरांच्या घोले रस्त्यावरील बंगल्यावरच रविवारी मध्यरात्री चोरटयांनी हात साफ केला आहे.

पुणे : शहराचे प्रथम नागरीक असलेल्या महापौरांच्या घोले रस्त्यावरील बंगल्यावरच रविवारी मध्यरात्री चोरटयांनी हात साफ केला आहे. विशेष म्हणजे या बंगल्याच्या आवारात तीन सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडला आहे. ही सुरक्षा व्यवस्था भेदून आत घुसलेल्या चोरटयांनी हॉलमधील 42 इंची एलसीडी टीव्ही लंपास केला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर या चोरीची तक्रार सोमवारी दुपारी डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांनी दिली. दरम्यान, बंगल्यावर रविवारी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांची तत्काळ बदली करण्यात आली असून या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेकडून महापौरांसाठी घोले रस्त्यावर निवासस्थान बांधण्यात आले आहे. महापौरांकडून राहण्यासाठी या घराचा वापर केला जात नसला तरी, दिवसभरात अनेकदा महापौर दुपारचे जेवन तसेच बैठकासाठी या घराचा वापर करतात. त्यामुळे या बंगल्यावर नेहमीच वर्दळ असते. रविवारी रात्रीही नेहमी प्रमाणेच रात्री हा बंगला त्याचे व्यवस्थापन पाहणा-या शिपयांनी कुलूप लावून बंद केला होता. मात्र, सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे घराची स्वच्छता करण्यासाठी तसेच रात्री सुरू केलेले दिवे बंद करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक घरात गेले असताना, हॉलमधील एलसीडी गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच हा एलसीडी चोरी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तत्काळ या प्रकाराची माहिती घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)प्रथम नागरिकाचे घरच ‘असुरक्षित’ शहराचे प्रथम नागरीक म्हणून महापौर ओळखले जातात. मात्र, या चोरीमुळे प्रथम नागरीकाचे घरही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. महापौरांचे घर असल्याने या ठिकाणी अनेकदा आमदार, खासदार, परदेशातून शहराच्या भेटीवर आलेले डेलीगेटस या ठिकाणी उपस्थित असताता, मात्र, या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतानाही एलसीडी चोरीस गेला आहे. त्यामुळे महापौर बंगला सुरक्षित आहे का हा सवाल उपस्थित केला जातोय.