शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील पवना धरण 100 टक्के फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:18 IST

लोणावळा, दि. 20 - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे धरणाची ...

लोणावळा, दि. 20 - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे.संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडत 3680 क्यसेक्सने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे.आज दुपारी एक वाजता धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडत त्याद्वारे 1472 क्युसेक्स व हायड्रो गेटद्वारे 1428 क्यसेक्स पाणी धरणातून सोडण्यात आले होते मात्र पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दुपारी 3.30 नंतर यामध्ये वाढ करत सहा दरवाज्यांवाटे 2208 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. लोणावळा व मावळ परिसरात मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना धरण हे शंभर टक्के भरले असून धरणात 8.512 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाची संततधार व जोर आजही कायम असल्याने धरणातून दरवाजे व हायड्रो गेटमधून 3680 क्युसेक्सने पाणी विसर्जित करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.पावसामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत असताना तीच्यामध्ये धरणातून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर येण्याची शक्यता ध्यानात घेत नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.