शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...त्या माऊलीचं धावणं अखेर थांबलं,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

करे यांच्या पतीचं कोरोनानं निधन प्रशांत ननवरे बारामती :बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती भगवान करे ...

करे यांच्या पतीचं कोरोनानं निधन

प्रशांत ननवरे

बारामती :बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती भगवान करे यांचं बुधवारी (दि. ५) कोरोनानं निधन झालं. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावत लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना अखेर मंगळवारी (दि. ४) रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.

करे यांचे पती महिला हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मंगळवारी (दि. ४) दुपारी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा अनिता गायकवाड हॉस्पिटलकडे जात असताना त्यांना लता करे रस्त्याने जाताना दिसल्या. त्या फार अस्वस्थ वाटल्याने गायकवाड यांनी करे यांची विचारपूस केली. या वेळी करे यांनी, माझे पती अ‍ॅडमिट आहेत त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यानंतर गायकवाड यांनी त्यांना औषधे घेऊन दिली. मात्र, उपचार सुररूअसताना त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.

२०१३ मध्ये त्या प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता यांचे त्यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर सलग तीन वर्षे त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅटट्रिक साधली. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या. हृदयविकारातून त्यांनी पतीला वाचविले, मात्र कोरोनापासून त्यांना त्या वाचवू शकल्या नाहीत.

करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे ९ वर्षांपूर्वी बारामतीत वास्तव्यास आले आहे. बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो, हे कुटुंंब एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे.

पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहून त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. ‘लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे, करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए. कृष्णा अरुबोधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर नवीन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मार्च २०२१ मध्ये जाहीर झाला आहे.

फोटोओळी—संग्रहित फोटो

लता भगवान करे.

०५०५२०२१ बारामती—०१

—————————————