शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

फुलांनी सजविलेल्या पालखीतून माऊलींची नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीनिमित्त मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात ...

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीनिमित्त मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर दुपारी एक वाजता नित्यनियमाप्रमाणे माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. तत्पूर्वी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात संचारबंदी लागू असल्याने इतिहासात प्रथमच कार्तिकी एकादशीच्या दिवशी मंदिर भाविकांविना सुने-सुने असल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला ८ डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. माऊलींचा संजिवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह शुक्रवारी (दि.११) आळंदीत दाखल झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे - पाटील, सोहळा मालक बाळासाहेब पवार, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सचिव अजित वडगावकर, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.

रथोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही

पंढरीहून नामदेव महाराजांच्या दिंडीचे पादुकांसह आगमन झाले. त्यांनीही विधिवत नगरप्रदक्षिणा घातली. शनिवारी (दि.१२) दुपारी चार ते सात यावेळेत माऊलींचा रथोत्सव कार्यक्रम आहे. मात्र, यंदा हा रथ हाताने ओढण्यास बंदी असल्याने स्वयंचलित वाहनात प्रतिकात्मक स्वरूपात रथोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी ५० जणांच्या उपस्थितीतीला परवानगी आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही.

* पहाटे ४ ते ५ मान्यवरांच्या हस्ते पंचोपचार पूजा.

* पहाटे ३ ते ६ मुक्ताई मंडपात काकडा भजन.

* सायंकाळी ४ ते ७ रथोत्सव.

* सायंकाळी ४ ते ६ वीणा मंडपात कीर्तन.

* रात्री ९ ते ११ वीणा मंडपात केंदूरकरांचे किर्तन.

* रात्री ११ ते १२ खिरापत पूजा, प्रसाद वाटप.

फोटो ओळ :

१) तीर्थक्षेत्र अलंकापुरीत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने माऊलींची सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

२) महापूजेनंतर माऊलींचे दिसणारे साजिरे रूप.