शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:34 IST

कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले.

लासुर्णे : कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले. त्याने या डावावर प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे उद्योग समूहाच्या वतीने स्व. बाबासाहेब फडतरे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या वेळी कोल्हापूरच्या योगेश बोंबाळेने दिल्लीच्या अमितकुमारला घिस्सा डावावर चितपट केले. कार्तिक काटे याने पोपट घोडकेला बँकसालतो डावावर धूळ चारली. कौतुक दाफळे याने मोळी डावावर विजय धुमाळचा विजय खेचून आणला. कुर्डूवाडीच्या सुनील शेवतकरने सवारी करून दिल्लीच्या सिकंदरला चितपट केले. कळंबचा ५ मेचा आखाडा प्रसिद्ध असल्याने या मैदानात सहभागी झालेल्या मल्लांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या खेळल्या. या आखाड्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा तर महाराष्ट्रातून सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आदी भागांतून नामवंत मल्ल आले होते.या वेळी माढ्याचे आमदार बबन शिंदे, प्रशांत परिचारक, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, प्रताप पाटील, मल्लसम्राट रावसाहेब मगर, नारायण देवकर, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.या मैदानाचे आयोजन फडतरे उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे, बाजार समिती संचालक दत्तात्रेय फडतरे, हनुमंत फडतरे, मंगेश फडतरे यांनी केले. कुस्ती समालोचन शंकर पुजारी व प्रशांत भागवत यांनी केले.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या