शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानले जाते. मात्र, मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानले जाते. मात्र, मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तेही जातपात, धर्म, प्रांत आणि भाषा यांना फाटा देत पंजाब राज्यातील तरुणी महाराष्ट्र राज्यातील तरुणाच्या प्रेमात पडली. इतकंच काय हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भगवानला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही स्टोरी पुणे जिल्ह्यात घडली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मोबाईल लुडो गेम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भिगवण गावच्या १९ वर्षांच्या तरुणाची ओळख पंजाब राज्यात राहणाऱ्या तरुणीशी झाली. ओळखीतून एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होत त्याचे रुपांतर प्रेमात झाले. मग पुढे काय सुरु झालेल्या चॅटिंगमध्ये या दोन प्रेमी युगुलाने एकत्र येण्याचे ठरविले. प्रेमिका पंजाबपासून निम्मे अंतर पार करून आली तर प्रियकराने निम्मे अंतर पार करत प्रेमिकेला आपल्या घरी घेऊन आला. प्रेमिकेच्या घरच्यांनी शोध घेत पंजाबपासून भिगवणला धडक मारली.

भिगवण येथे आलेल्या पंजाबच्या नातेवाईकांनी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रेमी युगुलाला त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या वेळी पोलीस ठाण्यातील वातावरण एकदम तंग झाल्याचे दिसून आले. मुलीच्या बाजूने आलेली माणसे धडधाकट असल्यामुळे आणि यातून काही वादाचा प्रसंग येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे काम केले.

मुलीच्या वडिलांनी अनेक प्रयत्न करूनही मुलगी आपल्या प्रियकरासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. आता मुलगी २१ वर्षांची असल्यामुळे कायद्यानुसार तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर मुलगा १९ वर्षांचा असला तरी त्याने तिच्याशी लग्न केले नसल्यामुळे कोणतीच कारवाई पोलिसांना करणे शक्य नव्हते. मग काय भिगवण पोलीस या प्रेमी युगुलाच्या बाजूने उभे राहत मुलीच्या नातेवाईकांना समजूत घालत परत पाठविण्यास यशस्वी झाले. त्यामुळे अखेर पंजाबची प्रेयसी आणि भिगवणचा प्रियकर लिव्ह इन रिलेशनमध्ये घरी राहण्यासाठी गेले.

प्रचलित कायद्यानुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर १९ वर्षांच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही. त्यामुळे यात कारवाई काय करावी हे भिगवण पोलिसांनाही समजेनासे असल्याचे दिसून आले.

चौकट

प्रचलित कायद्यानुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर १९ वर्षांच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही, त्यामुळे यात कारवाई करत भिगवण पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मुलीची बाजू ऐकून घेत तिच्याच बाजूने निर्णय दिल्याने अखेर प्रेमच जिंकलं हे मात्र नक्की.