शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वडकी येथील तेलाच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सासवड रस्त्यावरील वडकी गाव येथील खाद्यतेलाच्या गोदामाला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या गोदामात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सासवड रस्त्यावरील वडकी गाव येथील खाद्यतेलाच्या गोदामाला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या गोदामात खाद्यतेल, तूप, मेडिसिन, केबल वायर, पेपर्स याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले होते.

सासवड रोडवरील वडकी गाव येथील गोदामात फॉर्च्युन ऑइल, इप्का लॅबोरेटरी ॲन्ड एम्बेसी प्रॉडक्ट, एम्वे आणि पेपर बूट या कंपन्यांचा माल होता. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीएक अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यांच्या मदतीला पुणे महापालिकेचे बंब पोहोचले होते. रात्रीची वेळ, पाण्याची कमतरता व शेडला व्हेंटिलेशन नसल्याने आग विझविण्यात अडथळा येत होता. आग अत्यंत भीषण स्वरुपाची होती. आत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल, तूप, केबल वायर, पेपर्स, मेडिसिन यांचा साठा असल्याने आग सातत्याने भडकत होती.

पीएमआरडीए अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, विजय महाजन व त्यांचे सहकारी, ५० जवानांनी तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. या आगीत किमान ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कुलिंगचे काम दुपारपर्यंत सुरू होते.

फोटो -