शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मसापची निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य

By admin | Updated: December 24, 2015 00:37 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे. मतदार याद्या निवडणूक निकालाच्या तीन महिने अगोदर देणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीची फेररचना करावी, अशा आशयाचे निवेदन त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.पत्रकार परिषदेत आडकर म्हणाले, ‘परिषदेच्या घटनेप्रमाणे कलम ११ऊ नुसार निवडणूक निकालाच्या अगोदर तीन महिने मतदार याद्या कार्यकारी मंडळाने निश्चित व जाहीर करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक होते; पण आठ दिवस उशिराने याद्या दिल्या आहेत. परिषदेच्या कार्यकारी मंडळाने यादी संमत करून दिल्यानंतर याद्या द्याव्या लागतात. याचे सूचक, अनुमोदक कोण, याचीही माहिती द्यावी लागते. १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते.’ ते म्हणाले, ‘कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह यांनी वेळेत बैठक घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. सभा दि. १५ ऐवजी २१ डिसेंबरला बोलाविली गेली. या बैठकीला कायदे सल्लागार या नात्याने मला बोलाविणे आवश्यक होते; पण मला बैठकीचा निरोप दिला नाही.’ मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांना पत्र दिले आहे. त्याची प्रत अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव आढाव, कार्यकारी विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त उल्हास पवार यांना दिल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)