ऑनलाइन लोकमत चाकण, दि. 15 - घटस्फोट देत नाही, या कारणावरून दमदाटी, शिवीगाळ करून पती व सवतीने एका विवाहितेला हातावर व डोक्यात बेदम मारहाण केल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा नवरा व सवतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई ( ता.खेड ) येथील विवाहिता मोनाली बाबासाहेब कर्पे ( वय २५, रा. चक्रेश्वर रस्ता, चाकण ) मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून, पती बाबासाहेब विठ्ठल कर्पे व त्याची पत्नी सविता ( दोघेही रा. मोई, ता.खेड, जि. पुणे ) ह्यांनी संगनमत करून मोनाली हिस बोलावून 'घटस्फोट दे' असे म्हणून दमदाटी करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांवरही काल रात्री उशिरा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद भोसले अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार सी.एम.गवारी यांनी दिली.
विवाहितेला पती व सवतीकडून मारहाण
By admin | Updated: January 15, 2017 18:37 IST