तळेगाव स्टेशन : धोंड्याच्या (अधिक) महिन्यात सासरच्या मंडळींनी जावयाला सोन्याची अंगठी व घड्याळ न दिल्याने मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे मानसिक छळ करून विवाहितेला जिवंत जाळल्याची घटना बुधवारी घडली. अक्षदा अनिल जाधव (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी मुलीची आई शारदा अंकुश मुंगळे (३९, रा. रासे-भोसे, ता. खेड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी मृत महिलेचा पती अनिल सुरेश जाधव (वय २५, वारंगवाडी, तालुका मावळ), तसेच नणंद शुभांगी सुरेश जाधव (वय २१) यांच्याविरुद्ध भादंवि ४९८ -अ, ३०२ /३४प्रमाणे गुन्हा दाखल केला. वडगाव मावळ न्यायालयात आरोपींना गुरुवारी हजर केले असता, १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले करत आहेत. (वार्ताहर)
विवाहितेला जिवंत जाळले
By admin | Updated: September 11, 2015 04:36 IST