शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

By admin | Updated: December 24, 2015 00:51 IST

केकच्या दुकानाबाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, केकच्या आॅर्डरसाठी लागलेल्या रांगा, चौका-चौकांत सांताक्लॉजच्या टोप्यांचे स्टॉल, त्याकडे कुतूहलाने पाहणारे चिमुरडे,

पुणे : केकच्या दुकानाबाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, केकच्या आॅर्डरसाठी लागलेल्या रांगा, चौका-चौकांत सांताक्लॉजच्या टोप्यांचे स्टॉल, त्याकडे कुतूहलाने पाहणारे चिमुरडे, असे चित्र शहराच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळत आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, कॅम्प परिसरसह अनेक भागांमधील बाजारपेठांना उत्सवी स्वरूप आले आहे.नाताळ हा लहानग्यांच्या जिव्हाळ्याचा सण. शाळेला सात-आठ दिवसांची सुटी असल्याने सर्वांच्याच उत्साहाला उधाण आलेले असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. सांताच्या टोप्यांशिवाय त्यांची हौस पूर्ण तरी कशी होणार? मग, दोन दिवस आधीपासूनच खरेदीची लगबग सुरू होते. शाळांमध्येही नाताळची पार्टी आयोजित केलेली असते. त्यासाठी छानसा ड्रेस, केक किंवा पेस्ट्री, चांदण्या-मोती लावलेल्या सांताच्या टोप्या अशा विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग दिसते. घराच्या; तसेच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, येशू ख्रिस्त, सांताक्लॉज यांच्या छोट्या मूर्ती, असे नानाविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. टोप्या २० रुपयांपासून, तर मुखवट्यांची किंमत ६० रुपयांपासून सुरू होते. केकच्या दुकानांमध्ये केकच्या आॅर्डर घेतल्या जात आहेत. त्यासाठी नमुना म्हणून सांता, क्रिसमस ट्री अशा विविध डिझाइनचे केक, पेस्ट्री उपलब्ध आहेत. बाजारपेठांच्या बाहेर सांताक्लॉजच्या वेशभूषेतील माणसे ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.दुचाकी रॅलीजिंगलबेल...जिंगलबेल..या गाण्याच्या सूरात आणि सांताक्लॉजच्या पोषाखात पुणे शहराच्या विविध भागांमधून आज नाताळ सणाच्या निमित्ताने दुचाकी रॅली काढण्यात आली. ख्रिस्ती युवक प्रार्थना मंडळाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात नेहरू मेमोरिअल हॉल येथून झाली आणि क्वार्टर गेट चर्च या ठिकाणी समारोप झाला. या रॅलीमध्ये चिमुकल्यांना चॉकलेट, पुस्तके, बॅग विविध प्रकारची खेळणी वाटण्यात आली. सॅन्ताक्लॉजला पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत होती. सॅन्ताक्लॉज सोबत फोटो, सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.