शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार स्थलांतरित, पण...

By admin | Updated: April 8, 2016 00:49 IST

पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोरेगाव भीमा येथील एसटी महामंडळाच्या जागेवरील बाजर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित करण्यात आला.

कोरेगाव भीमा : पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोरेगाव भीमा येथील एसटी महामंडळाच्या जागेवरील बाजर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित करण्यात आला. मात्र, विक्रेते ग्रामपंचायतीशेजारील जागेत न जाता महामार्गावर रस्त्याच्या कडेला बसल्याने पुन्हा एकदा वाहतूक जाम झाली. त्यामुळे येथे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी कोंडीत भर पडल्याने नागरिक हैराण झाले.पुणे-नगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसावाडी, शिक्रापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. वाघोली येथे तर वाहतूककोंडी नित्याचीच असते. सायंकाळी कारखान्याचे कामगार सुटल्यानंतर तर वाघोलीत दोन कि.मी. जाण्यासाठी वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास लागतो. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था केली असून, अद्याप ते सुस्थितीत चालत नसल्याने वाहतूककोंडी सोडविण्यास अडथळे येत आहेत. अशीच काहिशी स्थिती शिक्रापूरमध्येही आहे. या ठिकाणी बेशिस्तपणे थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी रोजच पाहण्यास मिळत आहे. कोरेगाव भीमा येथे सायंकाळी बेशिस्त पार्किंगमुळे व शासकीय कार्यालयांच्या अहवालानुसार आठवडेबाजारमुळे वाहतूककोंडी होत आहे. याबाबत डेक्कन चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर या कारखान्यांच्या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना कोंडी सोडविण्यासाठी सूचना केल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव स्वत: लक्ष घालून येथील कोंडी सोडविण्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतात.जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार कोरेगाव भीमाचा आठवडेबाजार स्माशनभूमी परिसरात स्थलांतरित करा; अन्यथा बाजार परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रांताधिकारी सोनप्पा यमगर, तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ आदींनी ग्रामपंचायतीला बाजार स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही झाली आहे. एसटी महामंडळानेही त्यांच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, याबाबतचे फलक लावले आहेत. महामंडळाच्या जागेत व रस्त्याच्या कडेला बाजार बसवण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.