शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतील कामचुकार कर्मचा-यांची ‘खैर’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:42 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी बाजारातील यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी रविवारी पहाटे तीन वाजता कोणताही लवाजमा बरोबर न घेता अचानक हजेरी लावली

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी बाजारातील यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी रविवारी पहाटे तीन वाजता कोणताही लवाजमा बरोबर न घेता अचानक हजेरी लावली. या वेळी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणा-या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचा-याचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या. नियमांचे उल्लंघन करणा-या अडत्यांनादेखील त्यांनी कडक समन्स बजावला. आता कामचुकारपणा करणा-यांची ‘खैर’ केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.पुणे विभागासह राज्य आणि परराज्यातून रात्रीपासूनच मार्केट यार्डातील विविध विभागात माल येण्यास सुरुवात होते. प्रत्यक्ष व्यवहार पहाटे सुरू होतात. मात्र हे सर्व व्यवहार कर्मचारी आणि बाजारातील घटकांच्या नियोजनावर अंवलबून असतात. बरेचसे नियोजन रात्रपाळीचे कर्मचारी आणि पहाटे कामावर रुजू होणाºया तोलणारांवर अवलंबून असते. बाजार आवारातील कर्मचारी आणि संबंधित घटकांना दिलेली जबाबदारी पार पाडली जात आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी खैरे यांनी अचानक पहाटे बाजारात हजेरी लावली. त्यात तीन कर्मचारी कामावर असताना झोपल्याचे निदर्शनास आले. तर एक कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वाहने सोडत असल्याचे आढळले. या चार कर्मचाºयांचे आठवडाभरासाठी निलंबन केले. २३ तोलणारांनी कामावर अर्ध्या तासाने हजेरी लावली. त्यामुळे त्यांनाही समन्स देण्यात आले. तसेच गेट क्रमांक एक ते गणेश मंदिरापर्यंतचे व्यापारी दहा फुटाचा नियम पाळत नसल्याने त्यांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.काही अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे घेत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी बाजार समिती प्रशासनाकडे केल्या आहेत. त्याची तपासणी खैरे यांनी केली. अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे कापत असतील, तर त्यास सत्यता आढळल्यास संबंधित अडत्यांवर परवाना रद्दची कारवाई केलीजाणार आहे.तरकारी विभागातील व्यवहार दुपारी एक, तर फळे विभागातील व्यवहार दुपारी दोननंतर सुरू राहिल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचाºयांच्या संख्येत वाढ करण्यात आली असल्याची माहितीही दिलीप खैरे यांनी सांगितली.