शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मार्क कमी पडले, आईबाबा ओरडले, काय करू?

By admin | Updated: June 1, 2017 02:37 IST

दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले काय करू? परीक्षेत कमी गुण मिळालेली आणि नापास झालेली मुले आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. निकालाच्या दिवशी इतर कुणी नसले तरी किमान पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते; पण मंगळवारी हेल्पलाइनचे कर्मचारीच त्यांचे ‘पालक’ बनले होते... मनातले विचार व्यक्त करण्यासाठी राज्यातील अनेक मुला-मुलींनी हेल्पलाइनचा आधार घेतला. परीक्षेचा निकाल म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते... परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर मुले आयुष्य संपविण्यापर्यंत पावले उचलतात, नैराश्य दूर करून त्यांना आधार देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच असते. मात्र त्यांच्या दबावामुळे मुलांमध्ये नैराश्य येते, त्यांचे कुणीतरी ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मन मोकळे करायचे असते. यासाठी ही मुले हेल्पलाइनचा आधार घेतात, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आयुष्यात खूप संधी मिळतील अशा माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जाते, मंगळवारी दिवसभरात २ ते ८ या वेळेत सुमारे २0 ते २५ मुलांनी संपर्क साधला असल्याची माहिती कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेचे वीरेन रजपूत यांनी दिली. हेल्पलाइन क्रमांक : अनिल गुंजाळ ९४०४२३५१४५, विरेन कनेक्टिंग एनजीओ १८००२०९४३५३एका माणसाचा फोन आला आणि तू नापास झाला आहेस, पास करायचे असेल तर १३ हजार रुपये भर, असे कुणीतरी एका नाशिकच्या मुलाला सांगितले. खरेच असे असते का? असा भाबडा प्रश्न त्या मुलाने केला... तर दहावीमध्ये ९१ टक्के पडले होते आणि आता बारावीत ५0 टक्के पडले असा एकजण सांगत होता... वाशिम, यवतमाळपासून अनेक भागांमधील मुला-मुलींनी फोन करून आपली भावना व्यक्त केली. नापास झालात किंवा कमी गुण पडले तरी निराश होण्याची आवश्यकता नाही, हीच नवी संधी आहे असे समजा अशा माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करीत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सहसचिव व समुपदेशक अनिल गुंजाळ यांनी सांगितले.