शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

भरमसाठ आवक झाल्याने झेंडू रस्त्यावर

By admin | Updated: October 12, 2016 01:33 IST

सऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याने दसऱ्याच्या दिवशी सकाळी पिंपरी बाजारपेठेत झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. दुपारी बारापर्यंत जोरदार विक्री झाली. मात्र,

पिंपरी : दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याने दसऱ्याच्या दिवशी सकाळी पिंपरी बाजारपेठेत झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. दुपारी बारापर्यंत जोरदार विक्री झाली. मात्र, दुपारनंतर बाजारपेठेत अचानक गर्दी कमी झाल्याने आठ ते दहा रुपये किलोने झेंडूची विक्री झाली. भरमसाठ आवक झाल्याने विक्रेत्यांनी झेंडू रस्त्यावर टाकला.नवरात्रोत्सवानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी बाजारपेठेसह शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यावर झेंडूची दुकाने थाटली होती. अष्टमीला ६० ते ७० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली. तर सोमवारी नवमी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीला आणल्याने ४० ते ५० रुपयेप्रमाणे विक्री झाली. दसऱ्याच्या दिवशीदेखील बाजारपेठेत झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने सकाळपासूनच ३० रुपये दराने विक्री सुरू होती. झेंडू खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी आठपासूनच पिंपरीतील झेंडू बाजार गजबजल्याने रस्त्यावरून वाट काढणेदेखील अवघड झाले होते. बहुतांश विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी केल्यामुळे,मोठमोठ्याने आवाज देऊन ५० रुपयांना दोन किलो याप्रमाणे विक्री केली. दुपारी बारानंतर मात्र बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने विक्रेत्यांनीदेखील १० ते १५ रुपये किलोने झेंडूची विक्री केली. (प्रतिनिधी)