शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धन उपक्रम

By admin | Updated: January 6, 2016 00:29 IST

मराठी वाङ्मय साहित्यात मोलाची भर घालून मराठी साहित्य समृद्ध करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सारस्वतांचा जीवनप्रवास आता आकाशवाणीवरून अनुभवता येणार आहे

पुणे : मराठी वाङ्मय साहित्यात मोलाची भर घालून मराठी साहित्य समृद्ध करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सारस्वतांचा जीवनप्रवास आता आकाशवाणीवरून अनुभवता येणार आहे. महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पुढील वर्षभर दर बुधवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी साहित्यिकांची माहिती साहित्य प्रेमींना आपली मराठी या नावाचा हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. या आगळया वेगळया उपक्रमाची सुरूवात बुधवार (दि.६) पासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या भागात महापौर तसेच दुस-या भागात महापालिकां आयुक्तांचे मनोगत असणार आहे. त्यानंतर ५० साहित्यकांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शहरात भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आकाशवाणीवरून प्रसिध्द साहित्यिकांचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. पुढील संपूर्ण वर्षभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या २२ भागांचे रेकॉर्डींग पूर्ण करण्यात आले असून बुधवारी सकाळी पहिल्या भागात महापौरांचे मनोगत असणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. हा कार्यक्रम दहा मिनिटांचा असणार असून त्यात भाषा संवर्धन समितीमधील सदस्य ज्येष्ठ साहित्यिकांचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यात त्यांची साहित्य संपदा तसेच जीवन प्रवास शब्दातून मांडणार आहेत. (प्रतिनिधी)