शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाने अध्यादेशाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे... या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय... एक मराठा ...

पुणे : मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे... या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय... एक मराठा लाख मराठा... अशा घोषणा देत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुजिंर सचिन आडेकर, महेश टेळे, किशोर मोरे, मीना कुंजीर, गणेश मापारी, श्रृतिका पाडाळे उपस्थित होते. राज्य सरकारने ईडब्ल्युएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात सरकारच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

रघुनाथ चित्रे-पाटील म्हणाले की, सरकार मराठा समाजातील काही ठराविक लोकांना गाजर दाखवून हाताशी धरुन फूट पाडण्याचे कारस्थान करीत आहे. परंतु, मराठा समाजाचे सुरुवातीपासूनचे आंदोलनातील लोक एकत्र आहेत. चार जणांना हाताशी धरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, जी मराठा समाजाची मागणीच नाही ती मराठा समाजाला थोपवणे ही बाब चुकीची आहे. गेल्या तीस वर्षापासूनच्या मागणीवर अशा प्रकारचे खाणेरडे राजकारण मराठा समाजातीलच काही नेते करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राजेंद्र कुंजीर म्हणाले की, या सरकारने मराठा समाजासमवेत रडीचा डाव खेळून डावपेच केले आहेत. हे आगामी काळात समजून देणार आहोत. त्याचबरोबर मराठा समाजात जनजागृती, साक्षरता करुन देऊन संघर्षाची तयारी करणार आहोत.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा तर खून

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आरक्षणांसह सर्व याचिकामध्ये ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन करुन दिलेले आरक्षण आव्हानित आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून (इडब्ल्युएस) आरक्षण दिल्यास मराठा आरक्षणाच्या घटनापीठासमोरील अंतिम सुनावणीमध्ये युक्तीवार करताना कायदेशीर अडचणी निर्माण होणार आहेत. राजकीय सोयीनुसार हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित ईसीबीसी केसचा पाया खिळखिळीत करण्यासाठीच असा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा खून आहे, असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केला.