पुणे : मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मोर्चा मार्गावर ४० आॅटो रिक्षा आणि जागोजागी लावण्यात आलेल्या स्पीकरच्या सहाय्याने सूचना देण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच २१ वॉच टॉवर्सद्वारे या मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच जागोजागी पोलीस मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत. पुण्यातील नागरिकांनी शक्यतो दिवसभरात मध्यवर्ती भागात येण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सातपासूनच गर्दी जमायला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यामधून येणाऱ्या वाहनांसाठी शहराच्या चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. टिळक चौकामध्ये पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पथके नेमण्यात आलेली आहेत. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चाला सुरुवात होताच टप्प्याटप्प्याने सहभागी लोकांना सोडण्यात येणार आहे. जेणेकरून २ गटांत सुरक्षित अंतर राहील. मोर्चा संयोजकांशी तसे बोलणे झालेले असून त्यांचीही याला सहमती असल्याचे पोलिसांनी सांगितले. संयोजकांनी ५ हजार स्वयंसेवक नेमलेले आहेत. त्यांचे स्वयंसेवक मोर्चा मार्गासह वाहनतळांवर लक्ष ठेवणार आहेत. यासोबतच जागोजागी २३ रुग्णवाहिकाही तैनात केल्या आहेत. अग्निशामक दल आणि पालिकेशीही समन्वय साधून आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्तउपायुक्त११सहायक आयुक्त१६पोलीस निरीक्षक१००सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक३५६होमगार्ड७00पोलीस कर्मचारी ५000एसआरपीएफ१६ तुकड्यानिमा, वज्र, वरुण तैनातविशेष उपाययोजना४0 स्पीकरसेट लावलेल्या आॅटो रिक्षा२१ वॉच टॉवरप्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हिडीओ कॅमेरेउंच इमारतींवरून ठेवणार ‘वॉच’बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) सात पथके७ स्ट्रायकिंग फोर्स२३ रुग्णवाहिका
मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी
By admin | Updated: September 25, 2016 05:01 IST