बारामती : बारामती शहरात तीन हत्ती चौक येथे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करून मनुस्मुती ग्रंथाचे दहन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड बारामती, बहुजन समाज पार्टी, लोकशाही युवा संघटना यांच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची बदनामी प्रकरणी जाहीर निषेध करून ग्रंथ दहन करण्यात आला.या वेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष तावरे,कांतिलाल काळकुटे, विनोद जगताप, तुषार तुपे, अजित भोसले, अमोल पवार, प्रविण गव्हाणे, जयवंत सातव, अजित चव्हाण, विशाल भगत,अक्षय शेलार, इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मनोहर भिडे यांच्या विरोधात सोमवारी (दि. १६) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.
बारामती येथे मनुस्मतीचे ग्रंथाचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:19 IST
मनोहर भिडे यांच्या विरोधात सोमवारी (दि. १६) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.
बारामती येथे मनुस्मतीचे ग्रंथाचे दहन
ठळक मुद्देजगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची बदनामी प्रकरणी जाहीर निषेध करून ग्रंथ दहन