शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर मामा भोसलेला साताऱ्यातून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मनोहर ऊर्फ मामा भोसले यास पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी साताऱ्यातून अटक करण्यात आली.

शशीकांत खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार खरात यांचे वडिलांना थायरॉइड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती) येथील मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा गळ्यावरील थायरॉइड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांच्याकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांच्या वडिलांच्या जिवाचे बरे वाईट होईल, अशी भीती घालून उकळले. पैसे परत मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस मनोहरमामा भोसलेचा शोध घेत होते. आरोपी मनोहरमामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यास गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी (दि. १०) अटक केली. त्याला बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणून अटक केली जाणार आहे. उर्वरित विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे हे दोघे आरोपी फरार आहेत. फरारी आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या मागावर पोलीस पथके असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.

आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहिरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे नोंद करण्यात आला आहे.