तरुणीचा सोशल मिडीयावरुन पाठलाग
पुणे : तरुणीने नकार दर्शविला असतानाही ट्रिवटर खाते, व्हॉटसॲप व फेसबुकवर वारंवार मेसेज टाकून सोशल मिडियाद्वारे पाठलाग करणार्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एन. जी. राजेंद्र असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. गेल्या १ वर्षापासून आरोपी त्रास देत होता
...........
६ दुचाकी, एक कार चोरीला
पुणे : शहरात एकाच दिवशी ६ दुचाकी आणि एक कार चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. नारायण पेठ, सोमवार पेठ, ससून हॉस्पिटल मेनगेट, कात्रज, पाषाण येथील सुतार चाळ, चंदननगरमधील एक्झोटीका सोसायटी शेजारील पठारे वस्ती, बिबवेवाडीतील विजय सुपर मार्केट समोर पार्क केलेल्या गाड्या चोरट्यांनी चोरुन नेल्या.
..........
आंबेगाव पठार येथे घरफोडी
पुणे : आंबेगाव पठार येथील वर्धमान पर्ल सोसायटीतील बंद फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी दोन घरातील ४३ हजार रुपयांचे चांदीच्या वस्तू व सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी विजय देशपांडे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे दोन ते पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.