शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादीतून तिकीट नाही

By admin | Updated: January 14, 2017 03:20 IST

निवडणुका जाहीर झाल्या, की पैलवान मंगलदास बांदल कुठून शड्डू ठोकणार? याची चर्चा नेहमीच होते. या वेळी ती सुरू असतानाच

पुणे : निवडणुका जाहीर झाल्या, की पैलवान मंगलदास बांदल कुठून शड्डू ठोकणार? याची चर्चा नेहमीच होते. या वेळी ती सुरू असतानाच राष्ट्रवादीकडून त्याना तिकीट मिळणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी बांदल किंवा त्यांच्या पत्नी यांना तिकीट देणार नसल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीत बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांचे नाव इच्छुक म्हणून समोर आले. या वेळी सुरेश घुले यांनी ज्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे, त्यांच्या पत्नीचा इच्छुक म्हणून अर्ज आलाच कसा? असा सवाल केला होता. याबाबत जालिंदर कामठे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट करीत, बांदल यांना वारंवार सांगूनही त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबविल्या नाहीत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ते किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल यांना तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत बांदल यांना विचारले असता, मला पक्षाने आजपर्यंत कुठलेही पत्र दिले नाही. पक्षाचा सक्रिय सभासद करून घेतले आहे. मी फक्त अजित पवार यांना मानतो. ते सांगतील तेव्हा मी ठरवेन. तोपर्यंत मी त्यांचा कार्यकर्ता आहे. ते म्हणाले, की कामठे यांनी मला फक्त पत्र देऊन दाखवावे. तसेच सुरेश घुले यांच्याबाबत बोलताना शरद पवार साहेबांच्या गाडीवर लाथा मारणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा किंवा नैतिकता शिकवू नये. त्यांनी पैैसे घेऊन कोणाची वकिलीही करू नये. माझ्यासमोर येऊन चर्चा करावी, असे आवाहन बांदल यांनी केले़