शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातील उमेदवारी माघारीसाठी मनधरणी

By admin | Updated: February 7, 2017 03:07 IST

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून, अर्ज माघारीची मुदत मंगळवारी दुपारी तीनपर्यंत आहे, त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा कस लागला आहे

पिंपरी : उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून, अर्ज माघारीची मुदत मंगळवारी दुपारी तीनपर्यंत आहे, त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा कस लागला आहे. अपक्षांना भाव आला आहे, उमेदवारी माघारीसाठी मनधरणी केली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकूण २ हजार ३०४ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीत १४३ अर्ज बाद झाले. अर्जावर स्वाक्षरी नसणे किंवा विविध कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ४६ उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले. निवडणुकीसाठी १ हजार ३५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतरच ३२ प्रभागांत निवडणूक रिंगणात कोण उमेदवार आहेत, हे स्पष्ट होईल.महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या मुदतीत १२८ जागांसाठी २ हजार ३०४ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये अनेक इच्छुकांनी एक किंवा दोन प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत एकूण १ हजार ३५८ अर्ज वैध ठरले आहेत. तर १४३ अर्ज बाद ठरले.(प्रतिनिधी)