शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याला पकडले

By admin | Updated: June 10, 2015 05:19 IST

एक लाख ४० हजारांची लाच स्वीाकारणाऱ्या शिरूरच्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

पुणे : नव्याने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी खरेदीदाराकडे दोन लाख मागून तडजोडीअंती एक लाख ४० हजारांची लाच स्वीाकारणाऱ्या शिरूरच्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी चंदननगर येथील हॉटेल नित्यानंद येथे ही कारवाई केली. मंडल अधिकारी गणेश सूर्यभान मुंढे (४८, रा. चंदननगर) आणि रवींद्र प्रकाश जाधव (३७, रा. धानोरी) अशी अटक अधिकाऱ्यांची नावे आहेत. मुंढे हा मूळचा बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाईचा आहे, तर जाधव हा उच्च शिक्षित असून, मूळचा जळगावचा रहिवासी आहे. तो २०१० मध्ये निवड मंडळामार्फत नियुक्त झालेला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्जुन सकुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने शिरूर तालुक्यातील मुखई येथील दहा गुंठे जागा खरेदी केली होती. या जागेच्या सातबारा उता-यावर नावाची नोंद करण्यासाठी मुंढे आणि जाधव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती एक लाख ४० हजारांची लाच या दोघांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. या संदर्भात जमीनमालकाने एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. आरोपींनी त्यांना नगर रस्त्यावरील हॉटेल नित्यानंदमध्ये बोलावले. खासगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी करून ती स्वीकारतानाच त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अर्जुन सकुंडे, सहायक आयुक्त जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.(प्रतिनिधी)