शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला पंपचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: पेट्रोल पंपावर फोनवर बोलू नका असे सांगणाऱ्या पंपमालकालाच तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: पेट्रोल पंपावर फोनवर बोलू नका असे सांगणाऱ्या पंपमालकालाच तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सोमवारी पेठ (तां.आंबेगाव) येथील आनंद या पेट्रोल पंपावर घडली.

अमर बाळासाहेब शेवाळे (रा. लांडेवाडी), पवन सुधीर थोरात (रा.मंचर), सुमित जालिंदर आढळराव (रा.लांडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष बबन धुमाळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता संतोष बबन धुमाळ हे पेट्रोल पंपावर आले. दुपारी सव्वा एक वाजता धुमाळ हे पंपावर असताना एका दुचाकीवरून तिघे पेट्रोल टाकण्यासाठी आले. या गाडीला नंबर प्लेट नव्हती. बुलेटमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गेले असता त्यातील एक पंपावरच मोबाईलवर बोलत होता. पंपावर फोनवर बोलण्यास बंदी असल्याने धुमाळ यांनी फोनवर बोलणाऱ्यास बोलू नका असे सांगितले. त्यावेळी त्याने अरेरावीच्या भाषा करत तुला माहिती आहे का फोन किती किमतीचा आहे. तू तुझे काम कर असे धुमाळ यांना म्हणाला. त्यावेळी धुमाळ यांनी त्याला पंपावर फोनवर बोलण्यात बंदी आहे. फोनवर बोलल्याने पेट्रोलियम पदार्थांना आग लागण्याची शक्यता असते. असे समजावून सांगत असताना बुलेट वरील दोघेजण खाली उतरले. तिघांनी तुला माहित आहे का मी कोण आहे, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पंपावर काम करणारे कामगार व मॅनेजर सोडवण्यासाठी आले असता धुमाळ यांना मारण्याची धमकी देत तिघे फरार झाले. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.