शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

आमडेच्या जागेला माळीणकरांचा होकार

By admin | Updated: February 2, 2015 00:27 IST

पुनर्वसनासाठी माळीण ग्रामस्थांनी आमडे येथील जागा निश्चित केली आहे. कशाळवाडीत पुरेशी जागा मिळत नसल्याने प्रशासनाने

घोडेगाव : पुनर्वसनासाठी माळीण ग्रामस्थांनी आमडे येथील जागा निश्चित केली आहे. कशाळवाडीत पुरेशी जागा मिळत नसल्याने प्रशासनाने नव्याने आमडे व चिंचेचीवाडी येथील जागा पाहिली. ग्रामस्थांनी बैठक घेऊन व जागेची पाहणी करून आमडेची जागा निश्चित केली. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागेअभावी रखडलेल्या पुनर्वसनाला आता गती मिळणार आहे. नव्या वर्षात प्रशासनाने पुन्हा नव्याने जागा शोधण्याचे काम सुरू केले होते. प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार बी.जी. गोरे यांच्यासह नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे, मंडल अधिकारी गणेश रोकडे, तलाठी एस.व्ही. पवार यांनी माळीण परिसरात फिरून जागा पाहणी केली. आमडे व चिंचेचीवाडी येथे दोन जागा पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेतले. चिंचेचीवाडी जागेत माळीण ग्रामस्थांची भात खाचरे असल्यामुळे ही जागा देण्यास काहींनी नापसंती दर्शवली होती. जागा निश्चित करण्यासाठी सर्व माळीण ग्रामस्थांनी आज (दि.१) बैठक घेतली. या वेळी नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे, मंडलाधिकारी गणेश रोकडे, सरपंच दिगांबर भालचिम, सुहास झांजरे, सीताबाई विरनक, भामाबाई झांजरे, तान्हुबाई लेंभे, संजय झांजरे, शिवाजी लेंभे, मच्छिंद्र लेंभे, सचिन लेंभे, दिलीप लेंभे, गोविंद झांजरे, लक्ष्मीबाई झांजरे व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ तसेच पुणे, मुंबई येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी मिळून आमडे येथील गट क्र. ४५ ची जागा पाहिली. या वेळी महसूल विभागाचे कर्मचारीदेखील हजर होते. जागा पाहिल्यानंतर माळीण ग्रामस्थांना ही जागा सोईची व योग्य वाटली. सर्वांनी मिळून या जागेला संमती दिली. (वार्ताहर)