बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम व्याजासह तातडीने द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, तालुकाध्यक्ष महेंद्र तावरे यांनी केली आहे.याबाबत माळेगाव कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले आहे. कारखान्याने गाळप केलेल्या उसाची उर्वरित २० टक्के एफआरपी व्यजासह तातडीने द्यावी. सध्या साखरेचे भाव प्रतिक्विंटल ३५०० ते ३७०० रुपये आहे. त्यामुळे व्याजासह एफआरपीसह टनाला ५०० रुपये जादा भाव देणे शक्य आहे.या परिस्थितीत दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात हे पैसे उपयुक्त ठरतील. ऊस जगविण्यासाठी हा पैसा उपयुक्त ठरेल. परिणामी उसाचे उत्पादन वाढेल. त्यातून पुढील गळीत हंगामात जादा ऊस उपलब्ध होईल. संचालक मंडळाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. दुष्काळी परिस्थितीत कोणतेही वाढीव काम करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ढवाण पाटील, तावरे यांच्यासह विलास सस्ते, विठ्ठलराव देवकाते, शिवाजी खोमणे, दीपक तावरे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
‘माळेगाव’ने एफआरपीची उर्वरित रक्कम द्यावी
By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST