शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव कारखान्यातील सत्तासंघर्ष शिगेला

By admin | Updated: September 9, 2016 01:53 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्षात दोघांवर संचालक पद गमवावे लागले. प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी ही कारवाई केली

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्षात दोघांवर संचालक पद गमवावे लागले. प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी ही कारवाई केली. विशेषत: संचालक पद रद्द करण्यात आलेले दोन्ही संचालक कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलमधूनच निवडून आले होते. याच अनुषंगाने आणखी १७ संचालकांनादेखील संचालक पद रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. त्यामध्ये कारखान्याच्या अध्यक्षांचादेखील समावेश आहे. फक्त दोघा संचालकांनी कारखान्याकडून अ‍ॅडव्हान्स न घेतल्यामुळे त्यांचे पद शाबूत राहणार आहे. कारखान्याचे सभासद विठ्ठल रामचंद्र टेकवडे यांनी तक्रार केली होती. कोकरे आणि गवारे यांनी कारखान्याकडून उचल घेतली होती. घेतलेली उचल ३० दिवसांच्या आत भरणा केली नाही. त्यामुळे टेकवडे यांनी सहकारी संस्था अधिनियमानुसार संचालक पद रद्द करावे, यासाठी अर्ज केला होता. त्यावर प्रादेशिक सहसंचालकांनी सुनावणी घेतली. कोकरे आणि गवारे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी म्हणणे मांडले. याशिवाय उज्ज्वला कोकरे यांनी मुदत मागितली होती. त्यालादेखील अनुमती देण्यात आली. त्यानंतर वकिलांमार्फत कोकरे यांनी लेखी म्हणणे सादर व युक्तिवाद करण्यासाठी मुदतवाढ मागितली. सहकार कायदा नियम ५८ नुसार मुदतवाढीचा अर्ज नामंजूर करण्यात आला. कोकरे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत केलेल्या खुलाशानुसार ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर कारखान्याकडून घेतलेली २ लाखांची रक्कम जमा केली, असे लेखी म्हणण्यातदेखील नमूद केले. ही बाब सहकार कायद्याचा नियम उल्लंघन करणार असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने दत्तात्रय गवारे यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. त्यांचेदेखील संचालक पद रद्द करण्यात आले आहे. गवारे यांनी कारखान्याकडून १ लाख रुपये उचल घेतली होती. (प्रतिनिधी)१७ संचालकांनादेखील कारणे दाखवा नोटीसकारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्यासह अन्य काही संचालकांवरदेखील याच प्रकारची तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर अध्यक्षांच्या गॅस एजन्सीकडून गॅसपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. कोकरे आणि गवारे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर विठ्ठलराव देवकाते या सभासदाने अन्य चार संचालकांच्या विरोधात घेतलेला अ‍ॅडव्हान्स परत केला नाही, अशी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशानुसार विशेष लेखापरीक्षक वर्ग १ अनिल सोनवणे यांनी चौकशी केली होती. या चौकशीनुसार दिवाळी अ‍ॅडव्हान्सपोटी प्रतिएकरी ३ हजार रुपये घेतले होते. ते परत करण्याची मुदतदेखील ३० दिवसांची आहे. त्यामध्ये दिरंगाई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अन्य १७ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचे संचालक पद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त होईल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.