शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दौंड रायझिंग अर्धमॅरेथॉन स्पर्धेत मलवाडकर प्रथम

By admin | Updated: December 22, 2016 23:59 IST

दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूर येथील चंद्रकांत मलवाडकर यांनी ७

दौंड : दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूर येथील चंद्रकांत मलवाडकर यांनी ७ किलोमीटरचे अंतर २२ मिनिटे २० सेकंदांत स्पर्धा पूर्ण करीत पहिल्या क्रमांकासह अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत एकूण ९९०० स्पर्धक धावले व त्यामध्ये दौंड शहर व तालुक्यासह मुंबई, पुणे, ठाणे, नगर, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना एकूण ९७ हजार रुपयांची बक्षिसाची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या मंगलमूर्ती कार्यालयाजवळ अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी झेंडा दाखवून केला. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाचचे समादेशक संजय शिंत्रे, समादेशक अजित बोऱ्हाडे, तहसीलदार विवेक साळुंखे, रेव्हरंड डेनिस जोसेफ, महेश भागवत, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल भंडारी, डॉ. राजेश दाते, विनायक काळे यांच्यासह भीमाजी भागवत, संदीप शितोळे आदी या वेळी उपस्थित होते. रोटरी क्लब आॅफ दौंड, माळवाडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब भागवत विद्यालय आणि रोटरी क्लब आॅफ कुरकुंभ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच ते बोरावकेनगरमार्गे मंगेश मेमोरियल शाळा ते लिंगाळी चौकपासून पुन्हा गट पाच, असा एकूण सात किलोमीटर अंतराचा अर्ध मॅरेथॉन मार्ग होता. ज्येष्ठ नागरिक गटात अनवाणी धावलेल्या शांता लखू चव्हाण (कुरकुंभ) यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय स्पर्धक राजेश गोसावी, डॉ. भावना धुमाळ व दीपाली गोसावी यांचादेखील पुरस्काराने गौरव करण्यात आला. समादेशक संजय शिंत्रे, तहसीलदार विवेक साळुंखे आदींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जे. एन. आवारी यांनी संयोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.