शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

पैैशाच्या आमिषाने बलात्काराचा बनाव

By admin | Updated: June 20, 2017 06:51 IST

उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट असून

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट असून, नारायणगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) परिसरातील दोघांनी पूर्ववैमनस्यातून आपल्या शत्रूंना तुरुंगात पाठविण्यासाठी महिला व इतरांना हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. बलात्कार झालाच नसून केवळ पैशाच्या आशेने आपण यांत सहभागी झाले असल्याची कबुली महिलेने दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी ही माहिती दिली. वैयक्तिक भांडणातून दोन तरुणांवर बलात्काराचा खोटा आरोप करून, त्यांना तुरुंगात पाठविण्याचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला. या तपासकामाबद्दल ग्रामीण पोलीस कौतुकास पात्र आहेत.उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे देवदर्शन करून परत घरी जाताना हा प्रकार शिंदवणे घाटात घडला.कटाची महिनाभर आधीपासून तयारी या दोन गटांतील तरुणांचा काही वर्षांपासून वाद आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी त्या दोघांना लवकरच खडी फोडायला पाठवणार असल्याची धमकीही दिली होती. कट रचणाऱ्यांनी संबंधित महिलेला व बनावट साक्षीदार तरुणांना मोटारीतून शिंदवणे घाटात फिरवून आदल्या दिवशी प्रात्यक्षिक (रेकी) करून घेतले होते. विश्रांतवाडी-येरवडा परिसरातून दोन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून कटात सहभागी करून घेतले. हा कट अमलात आणण्यासाठी जवळजवळ महिनाभर आधीपासून तयारी सुरू होती. या कटात एका महिलेसह एकूण सात जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे.