शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाबाबत सकारात्मक निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:31 IST

कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

नारायणगाव - कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.महाराष्ट्र राज्यात सन २०१२-१३ पासून कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी संबंधित संस्थांना कळविले असून, कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठांनी घेतलेल्या निर्णयामुळे उद्भवलेल्या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले व याविषयी सविस्तर चर्चा केली.या वेळी कृषी खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी मंत्री महोदयांना याविषयी सविस्तर माहिती दिली.महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रवींद्र जगताप, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर हे उपस्थित होते. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.या वेळी कृषी महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, ग्रामोन्नती मंडळ, नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, प्रकाश पाटे, साहेबराव नवले, प्रभाकर चांदणे, नीलेश नलावडे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, संजय भांड, गोवर्धन चव्हाण, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर उपस्थित होते.यापूर्वीही पांडुरंग फुंडकर कृषिमंत्री असताना या विषयावर बैठक बोलावली होती; परंतु चारही विद्यापीठांचे कुलगुरू या बैठकीसाठी हजर राहिले नाहीत, त्यामुळे या विषयावर तोडगा निघू शकला नव्हता. याप्रसंगी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कृषी तंत्रनिकेतन हा सन २०१२ पासून सरू असणारा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांनी सुरू ठेवावा, यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर विचार विनीमय करण्यासाठी दि. १८ जून रोजी एकत्रित बैठक बोलावली जाईल.अभ्यासक्रम व्यावसायिक दर्जा, कृषी पदवीसाठी प्रवेश, अभ्यासक्रम सुधारणा, याप्रश्नांबाबत सुद्धा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल , असा विश्वास या वेळी व्यक्त केला. या प्रश्नांबद्दल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली होती.विद्यापीठाच्या पातळीवरून कृषि तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यभरातील शिक्षण घेणारे १६ हजार विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या विषयावर उपाय म्हणून पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेला अभ्यासक्रम ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

टॅग्स :agricultureशेतीEducation Sectorशिक्षण क्षेत्रchandrakant patilचंद्रकांत पाटील