शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीचे कामकाज पारदर्शी करणार

By admin | Updated: March 30, 2017 03:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामकाज पारदर्शी होण्यावर भर आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे कामकाजही

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामकाज पारदर्शी होण्यावर भर आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे कामकाजही पारदर्शीच असेल. सर्व कामांचा व त्यासाठी लागणाऱ्या पैशांचा हिशेब जनतेला देण्यास आम्ही बांधील आहोत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांनी पक्षाने निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘सर्वांना बरोबर घेऊनच सर्व कामे केली जातील. प्रत्येक पैशाचा हिशेब देऊ. वाहतूक, कचरा, पाणी हे शहरातील सध्याचे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यांना प्राधान्य दिले जाईल.’’पत्रकारांनाही समितीचे कामकाज पाहता येईल, असे मोहोळ म्हणाले. त्यात लपविण्यासारखे काहीही नाही. याआधी असे का करीत नव्हते त्याबद्दल बोलायचे नाही; मात्र समितीची बैठक सुरू असताना पत्रकारही उपस्थित राहू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सभागृह नेते भिमाले पत्रकारांना समितीच्या बैठकीची दर मंगळवारी माहिती दिली जाईल, असे सांगत असताना मोहोळ यांनी त्यांना उपस्थितही राहता येईल, अशी दुरुस्ती केली. (प्रतिनिधी) अंदाज पत्रक आज आयुक्त बुधवारी (दि. ३०) स्थायी समितीला सन २०१७-१८चे प्रशासनाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्याविषयी काय वाटते, असे विचारले असता मोहोळ यांनी ‘त्यांना आधी सादर करू द्या; नंतर बोलू,’ असे सांगितले. समितीत त्यावर चर्चा होईल. पुणेकरांना अपेक्षित असलेलेच काम समितीकडून होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आम्ही त्यांना विकासाच्या कामात आमचे सहकार्य राहील, असा संदेश दिला असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.