शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या शेतात बिबट्या ठाण मांडून

By admin | Updated: February 4, 2016 01:37 IST

येथे गटवाडी शिवारात ऊसतोडणी सुरू असताना अचानक बिबट्या बछड्यांसह उसातून बाहेर येऊन गुरगुरला. त्यामुळे भेदरलेल्या मजुरांनी पळ

आळेफाटा : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे गटवाडी शिवारात ऊसतोडणी सुरू असताना अचानक बिबट्या बछड्यांसह उसातून बाहेर येऊन गुरगुरला. त्यामुळे भेदरलेल्या मजुरांनी पळ काढला व ऊसतोड बंद केली. दरम्यान हा बिबट्या बछड्यांसह तेथेच उसाच्या शेतात ठाण मांडून बसला आहे. वन विभागाने तेथेच दुपारच्या सुमारास पिंजरा लावला आहे; पण अद्यापपर्यंत बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर आलेला नाही.याबाबतची माहिती अशी : गटवाडी शिवारात मुकुंद रामचंद्र कुटे यांची ऊसतोडणी विघ्नहर कारखान्याचे वतीने सुरू आहे. आज (दि. ३) सकाळी नेहमीप्रमाणे ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणी सुरू केली. आठच्या सुमारास बिबट्या बछड्यांसह या ऊसशेतातून कडेच्या बाजूने बाहेर आला. प्रथम तो गुरगुरला व नंतर त्याने डरकाळी फोडली. समोरच बिबट्या दिसल्याने ऊसतोडणी मजुरांची एकच धांदल उडाली. बिबट्या आता हल्ला करणार, या भीतीने त्यांनी पळ काढला. त्यांनी ऊसउत्पादक मुकंद कुटे यांना माहिती देऊन ऊसतोडणी बंद केली. तर, बिबट्या बछड्यांसह ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच उसाचे शेतात ठाण मांडून बसला.दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. वनकर्मचारी व ग्रामस्थ तेथे गेले त्यांनी फटाके वाजवले. मात्र, तरीही बिबट्या जागीच गुरगुरत होता. जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या परिसरात वन विभागाचे रेस्क्यू पथक पाठविले. तेही तेथे गेले असता त्यांनाही बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. अखेर वन विभागाने या ठिकाणी दुपारनंतर पिंजरा लावला. पिंजरे लावले आहेत; मात्र बिबटे जेरबंद होत नसल्याने दहशत पसरली आहे. (वार्ताहर)