शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

अशक्य गोष्ट शक्य करून दाखवा

By admin | Updated: October 9, 2016 05:04 IST

तुम्ही असे काही करून दाखवा, की ज्यामुळे दुसऱ्यांना तुमची समीक्षा करता येऊ नये. यश मिळविण्याविषयीच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.

पुणे : तुम्ही असे काही करून दाखवा, की ज्यामुळे दुसऱ्यांना तुमची समीक्षा करता येऊ नये. यश मिळविण्याविषयीच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, दुसऱ्यांना अशक्य वाटेल अशी गोष्ट शक्य करून दाखविणे आणि त्याची लोकांनी नोंद घेणे, यालाच यश म्हणता येईल, असे मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले. तसेच, यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.लोकमत नॉलेज फोरम, साई बालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता, रिलांयन्स जिओ हे डिजिटल पार्टनर होते़चाटे शिक्षण समूह, पुणे इंटरनॅशनल स्कूल, टिंगरेनगर या शिक्षणसंस्थांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात चेतन भगत बोलत होते. विद्यार्थ्यांनी चेतन भगत यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच, भगत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाला साईबालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मनीष मुंदडा, रिलायन्स जिओचे मार्केटिंग हेड निखिल मेहरा, लोकमतचे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, निनाद देसाई, लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर आदी उपस्थित होते.कठोर परिश्रम, कामावरील निष्ठा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात यशाकडे वाटचाल करावी. हिंदीमध्ये ‘औकात’ असा शब्द विशेष अर्थाने वापरतात, असे नमूद करून भगत म्हणाले, ‘‘अपनी औकात से जादा कर दिखानाही सक्सेस है। जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन (पॅशिनेटली) काम करावे. त्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ध्येय का निश्चित करता, त्यामागे ठोस कारण असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांकडे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा कृतिकार्यक्रम असायला हवा. कोणतेही ध्येय पूर्ण करताना अनेक अडचणी येतील; मात्र त्यांना सामोरे जाण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जीवनात नियमितपणे केलेल्या गोष्टींना यश म्हणता येणार नाही.’’जेव्हा तुम्ही क्षमतेपलीकडे जाऊन काम करून दाखविले आणि लोकांनी त्याची नोंद घेतली, त्याला यश म्हणाता येईल. अपयश आले म्हणून मागे न जाता पुन्हा सावरून उभे राहण्यास शिकले पाहिजे. तणावाखाली न राहता बाहेर येण्याचा प्रयत्न करावा, असेही भगत यांनी सांगितले. विजय बाविस्कर यांनी आभार मानले. अजिंक्य देशमुख व लिना सलढाना यांनी सुत्रसंचलन केले.(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या यशाच्या व्याख्या... ‘तुमची स्वाक्षरी जेव्हा आॅटोग्राफ’ बनते त्याला यश म्हणता येईल, ध्येयपूर्तीनंतरच्या समाधानाला यश म्हणावे, आनंदाचा पाठलाग करणे म्हणजे यश, स्वप्नांचा पाठलाग म्हणजे यश, पैसा आणि ताकद मिळविणे म्हणजे यश अशा यशाच्या व्याख्या विद्यार्थ्यांनी चेतन भगत यांना सांगितल्या.विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स...कामात अधिकाधिक नावीन्य, स्वत:च स्वत:ला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, संयम, सहकाऱ्यांची मदत घेऊन तुम्हाला यशस्वी होता येऊ शकते, अशा टिप्स चेतन भगत यांनी दिल्या. तसेच, स्वभावातील उद्धटपणा बाजूला ठेवून यशप्राप्तीकडे वाटचाल करायला हवी, असेही चेतन भगत यांनी सांगितले.