शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर, रेल्वे भरतीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा खोलवर जात तपास केल्यानंतर, आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा खोलवर जात तपास केल्यानंतर, आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरतीचा मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भारत कृष्णा काटे (वय ४१, रा. मु़ पो़ राजुरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) राजेंद्र दिनकर संकपाक (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बी. के. सिंग (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सलमान गौरुउद्दीने शेख (वय २१, रा. मु़ पो़ करडखेल, लव्हारा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्ह्याचा कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे तसेच ‘आयटीअ‍ॅक्ट’च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील विविध ठिकाणी हा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये घडला आहे.

आरोपींनी आपापसांत संगनमत करून सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाध यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली. तसेच, फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांची खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले. तसेच पुण्यातील घोरपडी येथील आर्मी कार्यालयासमोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली. त्यांनी हेडक्वार्टरल आर्मी या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे चौघांकडून १३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तिपत्रे देण्यात आली.

याबाबतचे लष्कराच्या इंटेलिजन्सला इनपुट मिळाले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी लष्कराच्या मदतीने सोलापूर येथून दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लष्कर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष झीरो टॉलरन्स असावी, यासाठी आर्मीचा कटाक्ष आहे. त्यातून अशा गुन्ह्यांमध्ये लष्कराकडून पोलिसांना माहितीची देवाण घेवाण करण्याबरोबर तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे सर्दन कमांडच्या वतीने सांगण्यात आले.

...

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्कर भरतीतील पेपरफुटी प्रकरणात लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्र्यांना अटक करून मोठे रॅकेट उद्ध्ववस्त केले होते. त्यासाठी लष्कराच्या मदतीने देशातील विविध भागातून लष्करी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. लष्कर व रेल्वे भरती प्रकरणात मोठे असण्याची शक्यता असून त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.