शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन 

By श्रीकिशन काळे | Updated: October 24, 2023 09:22 IST

पुण्यात नागरीक चेतना मंच ही संघटना सुरू केली होती. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली‌.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मेजर जनरल सुधीर श्रीराम जठार (निवृत्त) यांचे ९१ व्या वर्षी सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी व इतर नातेवाईक असा परिवार आहे. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला होता‌. 

त्यांची लष्करात एक मोठी कारकीर्द होती आणि त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात, त्यांची ऑइल इंडिया लि.चे निवासी मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते. त्यांनी सरकारमध्ये इतर प्रतिष्ठित पदे भूषवली आणि विविध सरकारी संस्थांकडून त्यांना तेल क्षेत्रातील कौशल्यासाठी बोलावण्यात आले होते. सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी आपले जीवन निःस्वार्थपणे समाजसेवेसाठी समर्पित केले होते. 

त्यांनी पुण्यात नागरीक चेतना मंच ही संघटना सुरू केली होती. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली‌. त्यात सक्रिय सहभाग घेतला. शहर विकासासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. वेताळ टेकडी येथून पुढे महापालिका पौड बालभारती रस्ता करणार होती. त्याच्या समितीवर तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. हा रस्ता केल्याने टेकडीचे नुकसान होईल आणि सेनापती बापट रोडवरील कोंडी काही सुटणार नाही, असा सल्ला त्यांनी दिलेला होता‌.