शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

५३ ग्रामपंचायतींवर येणार महिलाराज

By admin | Updated: March 31, 2015 05:28 IST

तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी येथील मावळ महसूलभवनामध्ये काढण्यात आली.

वडगाव मावळ : तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी येथील मावळ महसूलभवनामध्ये काढण्यात आली. तहसीलदार शरद पाटील यांनी ती जाहीर केली. त्यामध्ये अनसूचित जमाती पुरुष आणि स्त्री उमेदवारासाठी प्रत्येकी ५ जागांवर आरक्षण टाकण्यात आले. २३ ग्रामपंचायतींमधील सरपंचपद सर्वसाधारण पुरुष, तर २४ ग्रामपंचायतीमधील सरपंचपद सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी आरक्षित ठेवले. उर्वरित ५३ ठिकाणी महिला राज येणार आहे. सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर या सोडतीने पाणी पडले. काही ठिकाणी मनासारखे आरक्षण आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत होते. आरक्षणानंतर महसूलभवन परिसरात थोडी खुशी, थोडा गम असे चित्र दिसत होते.गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे : अनुसूचित जमाती : माळेगाव, सावळा, वडेश्वर, कुणे नामा, शिरदे. अनुसूचित जमाती स्त्री : खांड, कुसवली, कशाळ, इंगळूण, उदेवाडी.बिगरअनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती : अनुसूचित जाती : सोमाटणे, जांभूळ, चांदखेड, कुरवंडे, शिलाटणे. अनुसूचित जाती स्त्री : नाणोली तर्फे चाकण, वराळे, पाटण, चिखलसे, साळुंब्रे.अनुसूचित जमाती : मुंढावरे, बेबडओहळ, वाकसई, औंढे खुर्द, अनुसूचित जमाती स्त्री : शिळींब, कोथुर्णे, शिवली, इंदुरी, मळवली.या वेळी सभापती मंगल वाळुंजकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. या वेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आतिश परदेशी, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, नायब तहसीलदार लेजिंद्र बोबडे, राजकुमार गभाले, सुषमा पैकेकरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. महसूलभवन येथे पदाधिकारी व नागरिकांनी बहुसंख्येने गर्दी केली होती. दरम्यान या गावातील सरपंचपद आपल्यालाच मिळेल या भावनेत अनेक नेत्यांनी उधळपट्टी सुरु केली होती. ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे फ्लेक्स उभारण्यात आले होते. तसेच निवडणुकीसाठी तरुण कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. (वार्ताहर)