शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

‘माहेर’ला मिळाला ९१वा जावई!

By admin | Updated: December 11, 2015 00:53 IST

‘सनई-चौघड्यांच्या स्वरात, ढोलताशाच्या गजरात नवरदेव विवाह मंचकावर येताच फुलांचा वर्षाव व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या साक्षीने ‘माहेर’मधील दोन मुलींचा शास्त्रोक्त पद्धतीत विवाह झाला

कोरेगाव भीमा : ‘सनई-चौघड्यांच्या स्वरात, ढोलताशाच्या गजरात नवरदेव विवाह मंचकावर येताच फुलांचा वर्षाव व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या साक्षीने ‘माहेर’मधील दोन मुलींचा शास्त्रोक्त पद्धतीत विवाह झाला. पद्मावती ऊर्फ आरती व अश्विनी यांना सांसारिक आयुष्याचे जोडीदार मिळाले आणि ‘माहेर’च्या संस्थपिका सिस्टर लुसी कुरियन यांनी आतापर्यंत ९१ निराधार मुलींचे कन्यादान केले.‘माहेर’ या सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्रासह देशभरात ३७ पेक्षा जास्त शाखा आहेत. वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे १३० मानसिक आजाराने पीडित महिला, ४० अनाथ पुरुष, ४० वृद्ध , कुमारी मातांसह पारधी समाजाची १२० पेक्षा जास्त मुलं-मुली आहेत. उच्च शिक्षण देत मुलांना स्वत:च्या पायावर उभे करताना मानवता हाच खरा धर्म समजून त्या मुलांचे लग्नही करण्यात येते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्टुडंट ग्रुप’ही स्थापन करण्यात आला असून, मिनी बँकही आहे. मात्र, या सर्वांचे संगोपन करताना शासनाच्या एका रुपयाच्या मदतीशिवाय हे कामकाज चाहलते, हे विशेष. पद्मावती ऊर्फ आरती हिला सातारा येथील डॉक्टरांनी २०१४मध्ये माहेरमध्ये दाखल केले. तर, अश्विनी ही पुण्यातील नाना पेठ येथील एका संस्थेतून २०११मध्ये माहेरमध्ये दाखल झाली. आरतीचा विवाह पोहरे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील संजय यांच्याशी व अश्विनी हिचा विवाह गुणोरे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील अमोल याच्याशी झाला. आज सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ उरकल्यानंतर खासदार व छत्रपती शिवाजीमहाराजांचे १३वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले व ‘माहेर’च्या संस्थापिका ल्युसी कुरियन व अनेक मान्यवरांच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, बाळासाहेब खैरे, सातारा येथील जिल्हा परिषदेचे सभापती सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजान रावत, वढू बुद्रुकचे माजी सरपंच साहेबराव भंडारे, उत्तमराव भोंडवे, श्रीमंत झुरुंगे, माजी उपसरपंच गणेश गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी भंडारे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.आतापर्यंत कुरीयन यांनी ८९ मुलींचे कन्यादान केले होते. आज झालेल्या दोन्ही मुलींच्या कन्यादान भुमकर कुटुंबियांनी केल्याने माहेरमध्ये आज ९१वा लग्न सोहळा पार पडला. (वार्ताहर)