शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माधव गाडगीळ यांना महावितरणचा ‘शॉक’

By admin | Updated: March 14, 2016 01:13 IST

तुम्ही बिल भरले आहे, म्हणून निवांत राहू नका, कारण महावितरण कधीही तुमचा वीजपुरवठा खंडित करू शकते़ असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ माधव गाडगीळ यांना आला आहे़

पुणे : तुम्ही बिल भरले आहे, म्हणून निवांत राहू नका, कारण महावितरण कधीही तुमचा वीजपुरवठा खंडित करू शकते़ असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ माधव गाडगीळ यांना आला आहे़ याबाबतची माहिती अशी, माधव गाडगीळ यांचे पाषाण रोडला घर आहे़ या घराचे वीज बिलाबाबत त्यांनी आगाऊ रक्कम जमा केली आहे़ त्यांना फेब्रुवारीचे वीज बिल १७२८ रुपये आले़ त्यांनी आगाऊ रक्कम भरली असल्याने त्याच बिलात ४ हजार ४३० रुपये महावितरणकडे जमा असल्याचे दाखविले आहे़ तसेच गाडगीळ यांच्या पत्नी सुलोचना गाडगीळ यांच्या नावाने त्याच सोसायटीत एक घर आहे़ या ठिकाणी सध्या त्यांची मुलगी राहते़ या घराचे वीज बिल ८ मार्चला आॅनलाईन भरले आहे़ असे असतानाही याबाबत कोणतीही नोटीस न देता शनिवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज खंडित केली़ सर्वसामान्यांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले़ नेमका काय प्रकार घडला आहे, त्याची चौकशी करून सांगण्यात येईल, असे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले़