सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी ग्रामपंचायतीकडे असलेल्या पाणीपुरवठयाच्या वीजबीलाचे २२ लाख ९९ हजार रूपये थकविल्या कारणाने आज विद्युत वितरण कंपनीने या तीन गावांतील आठ पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीवरील विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी या तिन्ही ग्रामपंचायतींना सधन ग्रामपंचायती म्हणून ओळखले जाते. मात्र या ग्रामपंचायतीने गेल्या अनेक वर्षापासून विद्युत विररण कंपनीचे जवळपास २२ लाख ९९ हजार रूपये वीज बील थकविले आहे. मात्र ग्रामपंचायतींकडे वारंवार पाठपुरवा करूनही वीज बीले भरली जात नसल्या कारणाने आज सोमेश्वरनगर येथील विद्युत वितरण कंपनीने या तिनही गावांतील एकूण आठ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे आता तिनही गावातील साडेसहा ते सात हजार कुंटुंबांना आज सायंकाळ पासूनच पाणीपुरवठा होणार नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींकडे धाव घेतली आहे. वरील २२ लाख ९९ हजार या बीलापैकी वाणेवाडी या एकटया ग्रामपंचायतीकडे ३ लाख ११ हजार, १ लाख १२ हजार, ४ लाख ४६ हजार आणि १ लाख ९६ हजार अशी चार बीले, मुरूम ग्रामपंचायतीकडे ३ लाख ४८ हजार आणि ५ लाख ७४ हजार अशी दोन विद्युत पंपाची तर वाघळवाडी ग्रामपंचायतीकडे २ लाख आणि १ लाख १२ हजार अशी दोन विद्युत पंपाची बीले थकबाकी आहेत. देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतींच्या नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्यामुळे महावितरण कंपनीच्या वतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. देऊळगावराजे, वडगाव दरेकर, पेडगाव, आलेगाव, हिंगणीबर्डी, खोरवडी, शिरापूर, बोरीबेल, मलठण, काळेवाडी, राजेगाव, खानवटे, नायगाव, कोशिंमघर या ग्रामपंचायतींचा नळ पाणीपुरवठा विद्युत बिल थकल्यामुळे विद्युतजोड खंडित केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर विद्युत विभागाने कारवाई केल्यामुळे ग्रामपंचायतीची धांदल उडाली आहे. तर येथील ठराविक ग्रामपंचायती सक्षम आहेत त्यामुळे ते लगेच वीज बील भरू शकतात. परंतु, काही ग्रामपंचायतीना कर वसुल गोळा केल्यावरच वीजबील भरणे शक्य असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. दरम्यान खंडित झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना आता खाजगी जलशुद्धीकरण केंद्रावरून पिण्याचे पाणी घ्यावे लागेल. खाजगी जलशुद्धीकरण केंद्राची मनमानीही ग्रामस्थांना सोसावी लागेल. वाणेवाडी ग्रामपंचायतीची २० लाख घरपट्टी आणि पाणीपट्टीची बाकी थकीत असून वारंवार मागणी करूनही बाकी दिली जात नाही. प्रत्येक घरोघरी चार चार फेऱ्या मारल्या तरही पाणीपट्टी वसूल होत नाही.- शशिकांत जगताप,सदस्य, वाणेवाडी ग्रामपंचायतया ग्रामपंचायतीकडे लाखात बाकी आहे. मात्र या पंचायती ५ ते १० हजारांत भरत आहेत. याबाबत ग्रामपंचायतींना टप्प्याने बाकी भरण्याची सोय करून दिली आहे. ग्रामपंचायतींनी २० हजार रुपये भरल्यास वीजपुरवठा पुर्ववत करून देणार आहे.अभिजीत बीरनाळे, कनिष्ठ अभियंता, सोमेश्वरनगर विद्युत वितरण कंपनीमुरूम ग्रामपंचायतीच्या दोन पाणीपुरवठा विहीरींवरील जवळपास ९ लाखाच्या आसपास बील थकीत असून ग्रामस्थांना वारंवार विनवण्या करूनही थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टीची बाकी भरली जात नाही.- प्रदीप कणसे, सरपंच, मुरूम ग्रामपंचायत
ग्रामपंचायती, शाळांना महावितरणचा शॉक
By admin | Updated: February 4, 2017 03:56 IST