शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण आपल्या गावात

By admin | Updated: December 4, 2015 02:41 IST

महिन्यातील एका गुरुवारी एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर

पुणे : महिन्यातील एका गुरुवारी एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर, कापूरहोळ व खानापूर या गावांत आज हा उपक्रम राबविला असून, त्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.भोर, वेल्हा, पुरंदर व हवेलीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर या तालुक्यात सुरू झाला आहे. पवार यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याची माहिती दिली.महावितरणने विजेच्या समस्या सोडविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यात प्रत्येक गुरुवारी एक गाव घेऊन त्या विभागातील सर्व मनुष्यबळ त्या गावात घेऊन जाऊन तेथे एकाच दिवसात समस्या सोडविल्या जाणार आहेत.ही अभिनव कल्पना असून, महाराष्ट्रात प्रथमच येथे राबविण्यात येत आहे. खेड व बारामती विभागांशीही आमची चर्चा झाली असून, तेथेही ती राबविता येईल, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे पवार यांनी या वेळी सागितले. आज पहिल्याच गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या लोणीकंद या गावात कंद यांच्या हस्ते या उपक्रमाला प्रारंभ झाला. तसेच थेऊर, कापूरहोळ व खानापूर येथे महावितरणच्या टीमने तेथील सर्व समस्या सोडविल्या. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सर्वसाधरण सभेतही या उप्रकमाचे सदस्यांनी कौतुक केले. आमच्या तालुक्यातही हा उपक्रम राबवा, अशी विनंती केली. काही सदस्यांनी महिन्याला एक गाव घेतले, तर जिल्ह्यातील सर्व गावांतील ससम्या सुटायला वेळ लागेल, अशी शंका उपस्थित केली. यावर पवार यांनी पाच-पाच गावांत घेऊ, असे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदस्यांनी सुरुवातील आपल्या गावांत हा उपक्रम राबवावा, असे सांगितले. (प्रतिनिधी)या उपक्रमामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. सामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळेल. जसे निर्मल ग्राम ही शासनाची योजना आहे, तसे महावितरण आपल्या दारात जाऊन तेथील प्रश्न सोडविणार आहे. आमच्या गावातील अनेक प्रश्न आज निकाली निघाले.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद