शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’चा ग्राहकांना झटका

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

पुरंदर तालुक्यात सासवड सब डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना भरमसाठ बिले देऊन महावितरण कंपनीने लोकांना मोठा झटका दिला.

दिवे : पुरंदर तालुक्यात सासवड सब डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना भरमसाठ बिले देऊन महावितरण कंपनीने लोकांना मोठा झटका दिला. त्यामुळे अनेक ग्राहकांचे आलेले वीजबिल पाहून धाबे दणाणले. आपल्याला एवढे बिल कसे आले, अशी विचारणा करण्यासाठी अनेकांनी गेल्या चार दिवसांपासून ‘महावितरण’ कार्यालयात गर्दी केली. इलेक्ट्रॉनिक मीटर बसविल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जुन्या मीटरपेक्षा वाढीव रकमेची बिले येत होती. पण, दोन-तीन महिन्यांपासून ग्राहकांना दुप्पट किंवा चौपट बिले येऊ लागली. नवीन मीटरवरचे रीडिंग बरोबर आहे; पण, प्रत्यक्ष वापर कमी आहे, असे वीजग्राहकांचे म्हणणे आहे. अनेकांकडे पाणी गरम करण्यासाठी सौरबंब आहेत. घरगुती विचार केल्यास, सहा बल्ब, एक दूरदर्शन संच, एखादा फ्रिज असा सर्वसाधारण वापर आहे. यासाठी जुन्या मीटरवरील रीडिंगप्रमाणे वापर कमी-जास्त धरून तीनशे ते साडेचारशे वीजबिल येत होते. ते वाढून अकराशे ते सोळाशे रुपयांपर्यंत गेले आहे.याबाबत उप कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मीटरमध्ये काही दोष असल्यास आम्ही ते तपासून पाहू. पण, गेल्या महिन्याचे जास्त बिल लोकांना आले, ते कमी कसे करणार? याबाबत त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. ग्राहकांना भुर्दंड भरावा लागत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. सासवड सब डिव्हिजन अंतर्गत वीजग्राहकांची संख्या घरगुती, शेती, लहान-मोठे कारखाने, व्यापारी वा व्यावसायिक ग्राहक यांची एकूण संख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. एवढ्यांचे मीटर महावितरण तपासून कधी दोष घालवणार, हा प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)