Maharashtra Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘प्रचार की बात’ १७ ऑक्टोबरला पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:28 PM2019-10-10T12:28:52+5:302019-10-10T12:34:37+5:30

Pune Vidhan Sabha Election 2019 : शहरातील सर्वच मतदारसंघांना सोयीचे होईल, असे ठिकाण त्यासाठी निश्चित करण्यात येत आहे.

Maharashtra Election 2019 : PM Narendra Modi's 'sabha ' on 17 October in Pune | Maharashtra Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘प्रचार की बात’ १७ ऑक्टोबरला पुण्यात

Maharashtra Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘प्रचार की बात’ १७ ऑक्टोबरला पुण्यात

googlenewsNext
ठळक मुद्देस्थळ अद्याप निश्चित नाही : भाजपची बूथ यंत्रणा झाली कार्यान्वित शहरातील शैक्षणिक संस्थांनी त्यांची मैदाने प्रचारासाठी उपलब्ध करून देणे केले बंद

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेसाठी शहर भाजपाला १७ ऑक्टोबर (गुरुवार) ही तारीख मिळाली आहे. संपूर्ण पुणे शहरासाठी ते एकच सभा घेणार आहेत. यासाठी सोयीचे स्थळ निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपची संघटनात्मक स्तरावर असलेली बूथ यंत्रणा कार्यान्वित झाली असून ‘घरोघरी संपर्क’ हे सूत्र त्यांना दिले आहे.
शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी सांगितले, की पक्षाच्या केंद्रीय शाखेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबरला सभेसाठी येतील, असे कळवले आहे. ते सातारा येथेही त्याच दिवशी सभा घेणार आहेत. त्यामुळे वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पुण्यात त्यांची एकच सभा होणार आहे. शहरातील सर्वच मतदारसंघांना सोयीचे होईल, असे ठिकाण त्यासाठी निश्चित करण्यात येत आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांनी त्यांची मैदाने प्रचारासाठी उपलब्ध करून देणे बंद केले आहे. त्यामुळे मोठ्या मैदानांची कमतरता जाणवत आहे; मात्र त्यावर मार्ग काढण्यात येईल. पंतप्रधानांशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व अन्य काही मंत्र्यांच्या सभांचीही मागणी शहर शाखेने केंद्राकडे केली आहे. त्यांच्याही सभा प्रचारकाळात होतील, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.  
भाजपची संघटनात्मक रचना प्रचारासाठी कार्यान्वित झाली आहे. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच त्यांच्याबरोबर असणारे सदस्य, कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांत ही यंत्रणा काम करत आहे. त्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. नेहमीप्रमाणे घरोघरी संपर्क व भाजपच्या उमेदवाराचे नाव, पक्षाचे काम, गेल्या ५ वर्षांतील केंद्र तसेच राज्यातील कामगिरी याची मतदारांना थोडक्यात, पण प्रभावी माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्याशिवायच्या या यंत्रणेचा भाजपाच्या काही वर्षांतील राजकीय यशात मोठा वाटा आहे. केंद्रीय मंत्र्यांशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर भाजपच्या प्रचाराचा भार आहे. त्याशिवाय गेल्या ५ वर्षांत राज्य सरकारने पुण्यासाठी दिलेल्या मेट्रो, स्मार्ट सिटी, नदीसुधार, नदीकाठसंवर्धन, समान पाणीपुरवठा योजनांबाबतही पुणेकर मतदारांना सांगण्यात येईल.

Web Title: Maharashtra Election 2019 : PM Narendra Modi's 'sabha ' on 17 October in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.